१. सदर प्रशिक्षण शिबीर हे वय वर्ष ८ ते १५ ह्या वयोगटातील मुलां/ मुलीं साठीच आहे.
२. केवळ नाट्य प्रशिक्षण एवढेच उद्धिष्ट डोळ्यासमोर न ठेवता, सहभागींच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न या शिबिरातून केला जाईल.
३. शिबिराचा कालावधी सोमवार दिनांक १५/०४/२०१९ ते रविवार ०५/०५/२०१९ सायंकाळी ४.०० ते ६.०० असेल.
४. शिबिराचे संचालन मंडळाचे ज्येष्ठ कलाकार करतील. तसेच शिबिराला मार्गदर्शक म्हणून रंगभूमीशी निगडित मान्यवर आणि नामवंत ज्या मध्ये सर्वश्री केदार ओटवणेकर, सम्राट साळवी, संजीव पंडित, आशिष भिडे, सीमा घोगळे , डॉक्टर अनिल बांदिवडेकर, राजीव जोशी, आदींचा समावेश असेल.
५. शिबिराचा कालावधी आणि वेळ यात आवश्यकतेनुसार करावे लागणारे बदल एक दिवस अगोदर पालकांना सांगितले जातील.
६. शिबिरात प्रामुख्याने रंगमंचावरील वावर,सभाधीटपणा, संभाषण व रंगभूमीशी संबंधित गोष्टी शिकवण्यावर भर दिला जाईल
७. शिबिराचा समारोप शिबिरार्थींनी सादर केलेल्या कार्यक्रमानेच होईल जो शक्यतो मंडळाच्या वास्तूत होईल .
८. सुमारे तीन सप्ताहाच्या या शिबिराचे नाममात्र प्रवेश शुल्क रु. ५००/- फक्त असेल. प्रवेश घेतेवेळी मंडळात उपलब्ध असलेला अर्ज पूर्ण भरून शिबीर शुल्कासह मंडळात जमा करणे आवश्यक आहे.
९. अर्ज आणि प्रवेश शुल्क मंडळाच्या कार्यालयात बुधवार दिनांक ०३/०४/१९ ते गुरुवार दिनांक ११/०४/१९ या कालावधीत रविवार सोडून संध्याकाळी ६.०० ते ८.०० ह्या वेळेत रीतसर पावती देऊन स्वीकारले जातील.
१० प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ह्या नियमानुसार कमीत कमी ३० तर जास्तीत जास्त ४० जणांनाच शिबिरात प्रवेश दिला जाईल.
११ अमर हिंद मंडळातर्फे भाग घेतल्या जाणाऱ्या विविध “बालनाट्य” स्पर्धेत आणि इतरही स्पर्धांसाठी, शिबिरातील मुलांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.
१२. शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी मंडळाचे कलाविभाग प्रमुख श्री रवींद्र ढवळे यांचेशी ९९२०५७२९७४ या नंबरवर संपर्क साधावा.