क्रीडाविभाग

देशी मैदानी खेळांच्या वृध्दीसाठी अमर हिंद मंडळ अगदी स्थापने पासूनच कार्य करित आहे. सुरवातीच्या काळात हुतूतू, खो-खो, कुस्ती व शरीरसौष्टव या खेळ प्रकारांवर मंडळाने लक्ष केंद्रीत केले होते. या खेळांसोबत बँन्डपथक आणि लेझिम पथक कार्यरत होते. कालांतराने  कुस्ती व शरीरसौष्टव,  बँन्डपथक आणि लेझिम पथक हे प्रकार मागे पडले. मात्र कबड्डी, खोखोच्या साथीने लंगडी या खेळांना मंडळाने प्राधान्य दिले. त्यांची जोपासना केली. सुरवातीच्या काळात पुळेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तर त्यानंतर श्रीधर भोसले, उमेश शेणॉय, रमेश वरळीकर, अरुण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे संघ नावारुपास आले. त्यानंतर सुरुश देशमुख, विष्णु हरमळे, दिलिप भावे, संजय पेडणेकर, प्रफुल्ल पाटील, विजय राणे, रमेश नाटेकर व जतिन टाकळे यांनी आपापल्यापरिने मंडळाचा क्रीडा विभाग वाढविण्यासाठी कार्य केले. मंडळाने अनेक राज्यस्तरीय महत्वाच्या स्पर्धांचे आयोजन केले. राज्य खो-खो असोसिएशन, राज्य कबड्डी असोसिएशन, मुंबई खो-खो संघटना व मुंबई कबड्डी असोसिएशन यांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. मंडळाने अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत.

सर्व अधिकार राखीव © २०२३ - अमर हिंद मंडळ

loading
This website uses cookies and asks your personal data to enhance your browsing experience.