लिटील थिएटर बालरंगभुमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन अमर हिंद मंडळाने २००९ मध्ये अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या हे विनोद हडप लिखित बालनाट्य मराठी रंगभूमीवर सादर केले. या नाटकाचे दिगदर्शन संतोष पवार यांनी केले होते. तर पंकज चेंबुरकर, मृणाल चेंबुरकर, लीला हडप, दत्ता सावंत, शंतनू रांगणेकर, जुई सावंत इत्यादिंनी त्यात भुमिका केल्या होत्या. या नाटकाचे 30 प्रयोग झाले.