अमर ऊर्जा पुरस्कार – वर्ष ३ रे
दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, अमर हिंद मंडळाच्या प्रांगणात अमर ऊर्जा पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला होता. रोख रु.१०००००/- , सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारासाठी या वर्षी एकूण ७५ संस्थांनी अर्ज केले होते. या पुरस्काराच्या निवडीसाठी अर्ज केलेल्या ७५ संस्थांमधून ८ संस्था निवडून, ६ संस्थाना प्रत्यक्ष भेटी दिल्या व २ संस्थांची दूरस्थ पद्धतीने मुलाखत घेऊन त्यातल्या ४ संस्थाची पुरस्कारासाठी निवड केली. त्या संस्था पुढीलप्रमाणे.
१) आई डे केअर संस्था,पेण
२) आरंभ सोसायटी फॉर ऑटीझम आणि स्लो लर्नर चिल्ड्रेन, छत्रपती संभाजी नगर
३) जीवन संवर्धन फाउंडेशन, कल्याण
४) आदिवाशी पारधी समाज विकास संस्था,राशीन
मुंबई महानगर पालिकेचे सह आयुक्त श्री. चंद्रशेखर चोरे व पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. उदय देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कार्यकारिणीच्या सह्भागामध्ये हा दिमाखदार समारंभ संपन्न झाला.