अ) जनतेत शारीरिक शिक्षण, व्यायाम, देशी व विदेशी खेळ या विषयी आवड उत्पन्न करणे, आरोग्य सुधारणे, तसेच देशी व विदेशी
खेळांच्या चढाओढी व सामने घडवून आणणे
आ) शारीरिक शिक्षणाबरोबर बौद्धिक व सामाजिक सुधारणा घडवून आणणारे शिक्षण देणे.
इ) ज्ञानार्जनासाठी ग्रंथालय व वाचनालय चालवून वाड्मयीन विकासाचा प्रयत्न करणे तसेच विद्वान व्यक्तींची व्याख्याने,
व्याख्यानमाला, थोर पुरुषांचे स्मृतिदिन, राष्ट्रीय उत्सव, सहली व बौद्धिक चढओढींची व्यवस्था करणे.
ई) प्रचार, लोकशिक्षण व उत्पन्न यासाठी मुखपत्र म्हणून नियतकालिक चालविणे व इतर प्रकाशाने, प्रदर्शने, राष्ट्रीय खेळांचे सामने व
संमेलन तसेच नाटक, चित्रपट, गायन, नृत्य यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणणे.
उ) आजाऱ्यांसाठी शुश्रुषेची साधने, रोगप्रतिबंधक योजना जरून तर दवाखाना चालविणे, प्रथोमपचार वर्ग चालविणे व अम्ब्युलन्स
(रुग्ण-वाहिका) ची व्यवस्था करणे.
ऊ) लहानथोरांच्या बौद्धिक ज्ञानार्जनाची साधने उपलब्घ करून देणे.
ए) मंडळाच्या कार्याकरिता व सामाजिक कार्याकरिता स्वयंसेवक पथक, हस्तव्यवसाय वर्ग व बॅण्डपथक उभारणे आणि चालविणे.
ऐ) स्थावर, जंगम मालमत्ता मिळविणे आणि इतर हक्क, अधिकार विकत किंवा भाड्याने घेणे, अन्य मार्गाने मिळविणे, मालमत्ता
सुरक्षित ठेवणे, दुरुस्त करणे व वाढविणे तसेच त्यामध्ये आवश्यक ते फेरफार करणे.
ओ) मंडळाच्या उद्देशांना पोषक होईल अशाप्रकारे इतर संस्थांशी सहकार्य करणे व इतर कार्य करणे.
औ) वरील गोष्टी सध्या होण्याकरिता जरून त्या इतर गोष्टी करणे.
अं) वर उल्लेख केलेल्या सोयी समाजाला विनामुल्य अगर कार्यकारी समिती वेळोवेळी ठरवील त्या मोबदल्यात उपलब्घ करून देणे.