सदर स्पर्धेत मंडळाने सादर केलेल्या बंधनिर्बधांचे (१९८९) तृतिय क्रमांक, मनावासना (१९९३) द्वितिय क्रमांक, क्षणसाक्षात्काराचा (१९९५) द्वितिय क्रमांक, परंमनिधानंम (२०१३) द्वितिय क्रमांक, अँलोगोरिया द लेडी ऑर दि टायगर (२०१७) द्वितिय क्रमांक तसेच विभागात काम केलेल्या कलाकारांनी वैयक्तिक बक्षिसे मिळविली असून त्यातील कलाकार आज व्यावसायीक रंगभुमी, दुरदर्शन मालिका व चित्रपटांमध्ये मध्ये कामे करित आहेत. उदा.आशा शेलार, निर्मिती सांवत, सुचित्रा गुढेकर, नियती राजवाडे, संजय क्षेमकल्याणी, प्रज्ञा जावळे, शंतनु रांगणेकर (राष्ट्रपती पारितोषिक विजेता) व सीमा घोगळे.