‘वसंत व्याखानमाला’ हा ‘अमर हिंद मंडळा’चा स्थापनेपासूनचा एक महत्वाचा उपक्रम आहे. या सुप्रसिद्ध व्याख्यानमालेचे पहिले ज्ञानसत्र १५ एप्रिल १९४८ ते २२ एप्रिल १९४८ या आठ दिवसांत आयोजित करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला डॉ. डिसिल्व्हा हायस्कूल कंपाऊंड येथे सुरू झाली. वार्षिक वसंत व्याख्यानमाला हे या ‘अमर हिंद मंडळा’चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. १९४८ सालापासून ते आतापर्यंत अखंडितपणे ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करणारी महामुंबई आणि आसपासच्या परिसरातील ही एकमेव संस्था आहे. सदर व्याख्यानमालेमध्ये ज्यांचे भाषणे झाले त्यात श्री.ना.म.जोशी, सेनापती बापट, श्री.दादासाहेब मावळंणक, आचार्य अत्रे, प्रा.ना.सी.फडके यांनी भुषविल्या आहेत. व्याख्यानमालेला जोडून संगीत महोत्सव साजरा केला जात होता. या महोत्सवात लता मंगेशकर, आशा भोसले, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, हिराबाई बडोदेकर, राम मराठे, सरस्वती राणे, तबला नवाज अल्लारखाँ आणि बालगंधर्व अशा दिग्गज गायक-गायिकांनी, वादकांनी आपल्या कलेचा आविष्कार प्रकट केला. महंमद रफी या संगीत महोत्सवात गायिले. त्यानंतर काही वर्षे वसंतव्याख्यानमालेला जोडून नाट्यमहोत्सवाचे आयेजन केले गेले.
अमर हिंद मंडळातर्फे - व्याख्यानमाला वर्ष १ ले
दिनांक १४-२३ एप्रिल १९४८
वसंत व्याख्यानमाला २०२३ – वर्ष ७६ वे
वसंत व्याख्यानमाला २०२२ – वर्ष ७५ वे
वसंत व्याख्यानमाला २०२१ – वर्ष 74 वे
वसंत व्याख्यानमाला २०२० – वर्ष 73 वे
वसंत व्याख्यानमाला २०१९ – वर्ष ७२ वे
वसंत व्याख्यानमाला २०१८ – वर्ष ७१ वे
वसंत व्याख्यानमाला २०१७ – वर्ष ७० वे
वसंत व्याख्यानमाला २०१६ – वर्ष ६९ वे