मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकारी कार्यकर्ते, खेळाडू व कलाकार यांचे स्नेहसंमेलन सातत्याने आयोजित करताना विविध करमणूकीचे कार्यक्रम, संगित वाद्यवृंद, व्यवसायिक नाटकांचे प्रयोग मंडळाच्या प्रांगणात झाले. कालांतराने हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जोडून करण्यात येऊ लागला. मंडळाचे खेळाडू, कलाकार व तहहयात सभासद मिळून हा कार्यक्रम साजरा केला जातो.