अमर हिंद मंडळामध्ये १९८७ साली कलाविभाग सुरु झाला. श्रेष्ठ रंगकर्मी कै. विनोद हडप यांच्या नेतृत्वाखाली सुहास कामत, दत्ता सावंत, संजिव वढावकर, संजय क्षेमकल्याणी, दिलिप दळवी, आस्लेषा ढगे, सुचित्रा गुढेकर, आशा शेलार यांच्या सहाय्याने मंडळाने राज्यनाट्य स्पर्धा, विविध एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन कलाविभागाच्या कार्यास सुरवात केली. १९९५ मध्ये बालनाट्य प्रशिक्षण शिबीर तर १९९७ मध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा या उपक्रमांना सुरवात झाली. मंडळाचे पहिले कलाविभाग प्रमुख विनोद हडप यांनी सुरु केलेले कार्य कलाविभाग प्रमुख म्हणुन दत्ता सावंत यांनी १९९७ ते २०१७ पर्यंत साभाळले. त्यानंतर कलाविभाग प्रमुख पदाची जबाबदारी मंडळाने रविंद्र ढवळे यांचेकडे सोपवली आहे.