अमर हिंद मंडळ, दादर आयोजित नाट्य गीत गायन स्पर्धा
“अमर हिंद मंडळ“ दादर, ह्या संस्थेने आयोजित केलेल्या ४ थ्या “नाट्य गीत गायन”स्पर्धेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
1) कोरोना, कोविद १९ या जागतिक महामारीच्या साथीमुळे या वर्षी स्पर्धेचे स्वरूप बदलण्यात आले असून स्पर्धा दूरस्थ (ऑन लाईन) या पद्धतीने घेतली जाईल. स्पर्धा वय वर्षे १५ ते ५५ ह्या वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. आवश्यक वाटल्यास हीच स्पर्धा दोन गटात घेतली जाईल, हा निर्णय सर्वस्वी आयोजनकाचा असेल, जो स्पर्धकांच्या संख्येवर अवलंबून असेल. आवश्यकता भासल्यास स्पर्धकाला वयाचा दाखला म्हणून आधार कार्डाची प्रत द्यावी लागेल.
2) स्पर्धेची प्रवेश फी रु. १००/- फक्त. नोंदणी स्पर्धकाने आपले नाव, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक (भ्रमण ध्वनी) ई.मेल ऍड्रेस हि माहिती देणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०२१ आहे.
पैसे भरायच्या खात्याची माहिती.
Bank of India
Dadar (west) branch.
Account no. 001520100000011.
IFSC code – BKID0000015.
१० जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना एक संकेत स्थळ पाठविले जाईल.
त्या स्थळावर २५ जानेवारी २०२१ पर्यंत व्हिडिओ पाठवायचा आहे. स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दिनांक १४/०२/२०२१ रोजी होईल.
3) नाट्य संगीताचा कोणताही प्रकार ह्या स्पर्धेत सादर केला जाऊ शकतो.
4) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल ०४/०२/२०२१ ला जाहीर केला जाईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना व्हाट्स ऍप द्वारे त्वरित कळविला जाईल.
5) सूर लावण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉनिक तंबोरा वा तत्सम वाद्याचा वापर करता येईल.
6) प्रत्येक स्पर्धकाला आपले गाणे कमीत कमी ४ तर जास्तीत जास्त ६ मिनिटात सादर करावे लागेल तसेच स्पर्धकाने आपण सादर करणार असलेल्या गाण्या संबंधी माहिती सुरुवातीला स्वतःचे नाव आधी सांगून, नाटकाचे नाव,मूळ गायक,संगीतकार इत्यादी सांगणे अपेक्षीत आहे.
7) स्पर्धा दोन गटात झाल्यास तसेच अंतिम फेरी साठी निवड झालेल्या स्पर्धकांची संख्या २० असल्यास अंतिम फेरी स्टुडिओत घेतली जाईल. त्याही चित्रणाचे सर्व अधिकार अमर हिंद मंडळाकडे असतील. यावेळी तबला व हार्मोनियम या दोन्ही गोष्टींची सोय मंडळातर्फे केली जाईल. रेकॉर्डिंग पूर्वी प्रत्येक स्पर्धकाला पुरेशी तालीम दिली जाईल.
8) प्रत्येक स्पर्धकाला “अमर हिंद मंडळ” या संस्थेचे ऑन लाईन सहभाग प्रमाण पत्र दिले जाईल.
9) प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक (अनुक्रमे रुपये ७,०००/- , ५,०००/- आणि ३,०००/-), प्रमाण पत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.
10) परीक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम असून तो सर्व सहभागी कलाकारांसाठी बंधनकाकाक असेल
11) विजेत्या स्पर्धकांची गुणसंख्या सारखी होत असल्यास जे गाणे परीक्षक सांगतील ते स्पर्धकाला सादर करावे लागेल.
12) स्पर्धेसाठी आलेल्या व स्पर्धेत चित्रित झालेल्या सर्व व्हिडिओंचे अधिकार अमर हिंद मंडळाकडे असतील.
अधिक माहितीसाठी आपण अमर हिंद मंडळ, दादर. फोन नंबर ०२२ २४२२३५८९ (सायंकाळी ६.०० ते ८.०० पर्यंत), तसेच समीर चव्हाण ९८२१८१२३३८ अथवा श्री रवींद्र ढवळे यांच्याशी ९९२०५७२९७४ ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
प्रवेश अर्ज – डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

