अमर हिंद मंडळाची
स्मृतिचिन्ह आरेखन (डिझाईन) स्पर्धा 2024
गेली 77 वर्ष सामाजिक क्रीडा आणि कलाक्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेकडून , संस्थेच्या स्मृतिचिन्हासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्मृतिचिन्ह डिझाईन करण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्यावी. मंडळाच्या वेबसाईटवर त्याची अधिक माहिती पहावयास मिळेल. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. प्रवेश फक्त शंभर रुपये आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
सीमा कोल्हटकर – ९८६९७४२३१८, दिपक साडविलकर – ८८७९१२०८२८,
निलेश सावंत – ८१६९३३४६५२, तेजश्री भोसले – ७४९८१८७४१४
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
स्पर्धेचे नियम व अटी :
- एका स्पर्धकास जास्तीत जास्त दोन डिझाईन (आरेखन) पाठवता येतील.
- डिझाईन (आरेखन) डिजिटल फॉर्म मध्ये बनवलेले असावे हाताने काढलेले नसावे.
- मंडळाच्या कार्याला अनुसरून डिझाईन (आरेखन) असावे. डिझाईनसाठी फोन्ट (Font) वापरला तर तो देवनागरी मध्ये असावा. त्यासाठी मंडळाच्या वेबसाइट चा अभ्यास करावा. amarhindmandal.com
- डिझाईन (आरेखन) निवडण्याचा तसेच स्पर्धेसाठी पाठवलेल्या सर्व डिझाईनचे बौध्दिक संपदा मालकी हक्क मंडळाकडे राहतील आणि त्या करीता आवश्यक असलेले सर्व कागदपत्र आणि करार गरज पडेल त्या वेळी डिझाईन बनवणाऱ्या स्पर्धकास मंडळाच्या नावाने करून द्यावे लागतील. (त्यासाठी येणारा खर्च मंडळ करील)
- आलेल्या डिझाईन (आरेखन) मधूनच मंडळाचे स्मृतिचिन्ह म्हणून डिझाईन निवडण्याचे बंधन मंडळावर असणार नाही.
- डिझाईन (आरेखन) ची ३०० DPI रिसोल्यूशन असलेली Jpg इमेज असावी. मंडळाच्या वेबसाइट वर असलेला फॉर्म भरून त्यावर पाठवावी. (सोबत स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर, इ-मेल, राहत्या घराचा पत्ता ही माहीती द्यावी.)
- स्मृतिचिन्हाच्या डिझाईनचा आकार ६” X ४” ते ८” X १०” मधला असावा.
- फाईलची साईझ १ किंवा २ MB असावी.
- स्मृतिचिन्ह तयार करण्यासाठी तुमच्या डिझाईन नुसार कोणते साहित्य (मटेरियल) वापरणे अपेक्षित आहे हे नमूद करणे गरजेचे आहे.
- तयार केलेल्या स्मृतिचिन्हाचे सविस्तर विवरण १०० शब्दात करणे अपेक्षित आहे.
- अंतिम फेरीसाठी निवडलेल्या १० स्पर्धकांच्या डिझाईनची हाय रिसोल्यूशन ओपन फाईल मागवण्यात येईल.
- अंतिम फेरीत निवडलेल्या १० पैकी ५ स्पर्धकांनी त्यांच्या डिझाईन चे राईट (फोन्ट & IPR) मंडळाला द्यावे लागतील.
- स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ राहील.
- स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम क्रमांक ५०००/- द्वितीय क्रमांक ३०००/-, तृतीय क्रमांक २०००/- रुपये असे पारितोषिक देण्यात येईल.
- स्पर्धेचा निकाल फक्त विजेत्यांना कळवला जाईल, तसेच मंडळाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून घोषित केला जाईल.
- वरील स्पर्धे संबंधीचे सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाच्या व्यवस्थापक मंडळाकडे राहतील आणि ते सर्व स्पर्धकांना बंधनकारक असतील.
सीमा कोल्हटकर
प्रमुख कार्यवाह,
अमर हिंद मंडळ, दादर
Memento Design Competition 2024
Rules & Regulations
- Each participant can submit a maximum of two design entries
- It is mandatory to submit a digital entry. Hand drawn entries will be disqualified from the competition
- Designs should be conceptualised considering the activities and social initiatives undertaken by Amar Hind Mandal. Please visit the website amarhindmandal.com to understand the mandal’s activities in detail
- All rights related to selecting the design entry and IP of all design entries received will be with the Organizers (Amar Hind Mandal). The participants will be mandated to provide the required documentations and agreements to the Organizer at appropriate time regarding the same. The organizers will bear the cost of documentation
- The organisers are not liable to choose the design from the competition entries as Amar Hind Mandal’s memento
- It is mandatory for top 5 finalists to give design and IPR rights of their design to Amar Hind Mandal
- Last date to submit the design entry is 31st December, 2024
- The cash prize of Rs 5000/- for first place, Rs.3000/- for second place and Rs 2000/- for third place will be awarded respectively.
- The results will be announced on all the social media platforms of the organiser and only be communicated with the winners
- All rights related to this competition are reserved by the orgnaisers and it is mandated on all the participants.
Creative Guidelines
- The design entry should be a JPG image with 300 DPI resolution. It should be submitted via the Google form available on the website (along with other mandatory information such as participant’s name, contact details etc.)
- The memento design dimensions should be between 6”x4” to 8”x10”.
- File size should not exceed 2 MB
- It is mandatory to consider a plate in the memento design to incorporate text-based content for each eventInclude a plate in the memento to include some text for each event.
- Participants should mention the material to be used for the making of the memento from their design.
- Submit a 100-word concept brief about the Memento design